
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल तर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची पुस्तके, मार्गदर्शक व प्रश्नसंच ह्यांचे वितरण
पनवेल महानगरपालिका शाळा क्र. ०२ हुतात्मा हिरवे गुरुजी शाळा (दगडी शाळा) मधील इयत्ता ४वी व ७वी मधील शिष्यवृत्ती परीक्षेकारिता अर्ज केलेल्या ४० ते ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची पुस्तके, मार्गदर्शक व प्रश्नसंच ह्यांचे वितरण भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर सरचिटणीस अनिमेष ओझे ह्यांच्यातर्फे करण्यात आले.
सदर कार्यक्रमास पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकुर, महापौर नितीनभाई पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंदजी ढवळे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पनवेल शहर अध्यक्ष, नगरसेवक सुमित झुंजारराव, नगरसेवक राजु सोनी, रूचिता लोंढे, दर्शना भोईर, पनवेल शहर सरचिटणीस अमित ओझे, रुपेश नागवेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हिमेश बहिरा, प्रभाग अध्यक्ष अनिमेष पटवर्धन, हर्षल बहाडकर, आशुतोष पाटील, आकाश गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.



Be First to Comment