Press "Enter" to skip to content

पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तास तात्काळ उपचार

पनवेल : दि. 14 जुलै 2026 रोजी रात्री 11:48 वाजण्याच्या सुमारास, कळंबोली सर्कलकडे जाणाऱ्या खांदेश्वर पुलासमोरील शंकर मंदिराजवळ एका दुचाकी चालकाने पायी चालत असलेल्या व्यक्तीस धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात राकेश कुमार यांच्या उजव्या पायाच्या गुडघा व घोटा यामधील भागाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले.

यावेळी पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई क्र. 4697 महेंद्र गळवे हे ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईदरम्यान सरकारी वाहनाने पनवेल वाहतूक शाखेकडे जात असताना सदर घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखून नागरिकांच्या मदतीने जखमी पादचारी तसेच दुचाकी चालक या दोघांनाही स्वतः चालवत असलेल्या सरकारी वाहनातून तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे जखमीस त्वरित वैद्यकीय उपचार मिळू शकले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार हे वाहतूक नियमनासोबतच मानवतावादी कर्तव्यही तत्परतेने पार पाडत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यांच्या या तत्पर आणि संवेदनशील कार्याचे उपस्थित नागरिकांनी मनापासून कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.