सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले / नवी मुंबई #
आज १५ ऑगस्ट २०२० रोजी भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. कोरोना विषाणूची पार्श्वभुमी लक्षात घेता स्वातंत्र्य दिनाचा संपुर्ण कार्यक्रम हा सामाजिक अंतर राखण्याबाबत गृह मंत्रालय व आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन साजरा करावा असे आदेश दिले असल्यामुळे आजचा स्वातंत्र दिन समारंभ हा सामाजिक अंतर राखून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर तर्फे साजरा करण्यात आला.
दरवर्षी तेरणा हॉस्पिटलतर्फे स्वातंत्र दिनानिमित्त आरोग्य विषयक अनेक उपक्रम राबवले जातात परंतु या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता यावेळी खूपच काळजी घेऊन तसेच राज्य सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर मध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत; अनेक रुग्ण हे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत व या रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून डॉक्टर, नर्सेस तसेच पॅरा मेडिकल स्टाफ व इतर कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत असून आजचा स्वातंत्र दिन या देशातील कोव्हीड योद्धयांसाठी समर्पित आहे अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री संतोष साइल यांनी दिली.
Be First to Comment