


कडापे प्रतिनिधी ( प्रशांत म्हात्रे सर)
रा जि .प. शाळा कडापे येथे आपला शैक्षणिक अध्यापनाचे कार्य उत्तम रित्या पार पाडलेले आपल्याला ज्या गुरुजनांनी शाळेत मार्गदर्शन केलेले आहे ते गुरुजनांची बदली ही शासकीय निर्णयानुसार झाली असता गुरुजनांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कडापे शाळेमध्ये या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते.
शाळेचे मुख्याध्यापक हितेंद्र म्हात्रे सर व उपशिक्षक रमेश पाटील सर सदर कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती यांनी शाळेत घालवलेली दहा वर्षे विद्यार्थ्यांची या दहा वर्षात झालेले जडणघडण शाळेमध्ये केलेला आमूलाग्र बदल शालेय शिस्त तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात केलेली प्रगती हे वैशिष्ट्य होय. सदर कार्यक्रम शालेय व्यवस्थापन कमिटी व ग्रामस्थ मंडळ कडापे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलन तसेच निवास गावंड सर यांच्या ईशस्तवनाने झाली. आपल्या शिक्षकप्रति व शाळेतील शिक्षकप्रति विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. तसेच आपण कमिटीचे माजी अध्यक्ष जितेंद्र थळी स्नेहा थळी सरिता मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागेंद्र म्हात्रे सर यांनी म्हटलं विद्यार्थ्यांनि शिक्षकांचा आदर करावा व आपली शैक्षणिक प्रगती करावी व त्यानंतर सत्कारमूर्ती हितेंद्र म्हात्रे सर व रमेश पाटील सर आपले मनोगत व्यक्त करताना भावना विवश झाले शाळेने व येथील ग्रामस्थांनी दिलेले प्रेम हे आम्ही कदापि विसरू शकत नाही शाळेच्या व इथल्या आठवणी या तशाच कायम स्मरणात राहतील कार्यक्रमात माजी विद्यार्थी कडापे व शाळेच्या तर्फे तसेच शालेय व्यवस्थापण कमिटी व ग्रामस्थ मंडळ कडापे तर्फे सत्कारमूर्तीचा हितेंद्र म्हात्रे सर व रमेश पाटील सर यांचा सन्मानचिन्ह भेटवस्तू व मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान करण्यात आला .
शालेय विद्यार्थ्यांना सारडे विकास मंच तर्फे विशेष पारितोषिक देण्यात आले तसेच सत्कारमूर्ती यांनी शाळेसाठी फॅन डसबिंड फीनायल व तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्या पाऊच व इतर साहित्य हे देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत म्हात्रे सर यांनी केले व सूत्रसंचालन निवास गावंड सर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सारडे विकास म्हणजे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर सर हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी कडापे व ग्रामस्थ मंडळ कडापे यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले गणेश थळी यांनी कार्यक्रमासाठी आर्थिक स्वरूपात मदत केली शेवटी आभार प्रदर्शन चे काम प्रशांत म्हात्रे सर यांनी केले





Be First to Comment