
महाबळेश्वर : प्रतिनिधी
कौतिके चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सौंदरी येथे शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये येरणे केंद्रातील तब्बल 12 शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
फाउंडेशनच्या उपक्रमाचा हा तिसरा टप्पा असून, यापूर्वी पनवेल तालुक्यातील कोंडप व महोदर गावांतील शाळांमध्येही अशा प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले आहे.
फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळावे, त्यांच्या शिक्षणाची ओढ प्रखर व्हावी व समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे याची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.”
श्री. संतोष गायकवाड आणि श्री. ज्ञानेश्वर सकपाळ यांच्या सौजन्याने पार पडलेल्या या कार्यक्रमास कौतिके चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य श्री.ज्ञानेश्वर जाधव, श्री. आशिष मिश्रा, श्री. अभिनय सिंग, श्री. निलेश कुटे, श्री. अभिषेक सिंग, श्री. वैभव जाधव, श्री. विनायक जाधव तसेच कार्यक्रमास स्थानिक मान्यवर, शिक्षकवर्ग आणि गावातील नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून उपक्रमाची खरी यशस्विता अधोरेखित झाली.




Be First to Comment