

शारीरिक, मानसिक क्षमतेसोबत आध्यात्मिक बळ वाढवून स्वरक्षणार्थ सिद्ध व्हा ! – श्री सुनील कदम, हिंदू जनजागृती समिती
पनवेल – समाजात दररोज घडणाऱ्या घटना पाहता आपल्या जीवन असुरक्षित झाल्याचे दिसून येत आहे यासाठी स्वसंरक्षणाच्या कला शिकणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर उपासनेचे बळ वाढवून देवाची कृपा संपादन करणे हे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानीच्या उपासनेच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात देवाने त्यांचे रक्षण केले हे आपण इतिहासातून शिकलो आहे. हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे धर्मांतरण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अनेक ठिकाणी अशा घटना दररोज समोर येत आहेत. त्यामुळे आपण स्वतःच्या रक्षणासाठी सिद्ध होण्याची हीच वेळ आहे. शारीरिक, मानसिक क्षमतेसोबत आध्यात्मिक बळ वाढवून स्वरक्षणार्थ सिद्ध व्हा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे श्री. सुनील क़दम यांनी केले. ते समितीच्या वतीने नवीन पनवेल यथील साईबाबा मंदिर येथे संपन्न झालेल्या शौर्य प्रशिक्षण शिबिरात बोलत होते.
समितीच्या वतीने ही शिबिरे नवीन पनवेल येथील श्री साईबाबा मंदिर तसेच श्री समर्थ मंगल कार्यालय खोपोली येथे २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आली. या शिबिराचा स्थानिक युवक आणि युवतींनी लाभ घेतला. ‘समाजात विविध प्रकारचे वर्ग घेतले जातात परंतु हिंदू जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गामध्ये शारीरिक, मानसिक क्षमता वाढण्याबरोबरच आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी प्राधान्य दिले जाते’, असे श्री. सुनील कदम पुढे म्हणाले.
या शिबिरांत कराटे, लाठी काठी, दंड साखळी, या प्रशिक्षणासोबत स्वतःवर कठीण प्रसंग उद्भवल्यास त्याला विरोध करण्याची मानसिकता तयार होण्यासाठी प्रसंग घेण्यात आले. त्यातून मानसिक आणि शारीरिक बळ मिळाल्याचे आणि आत्मविश्वास वाढल्याचे प्रशिक्षनार्थीनी सांगितले. यावेळी प्रशिक्षणार्थींचे पालकही उपस्थित होते त्यांनीही या पाच दिवसीय प्रशिक्षणातून मुलांमध्ये खूप पालट झाल्याचे सांगून असे स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम समाजात नियमितपणे व्हायला पाहिजेत असेही अनेक पालकांनी अभिप्राय दिले.





Be First to Comment