



प्रतिनिधी आवरे ( शंकर पाटील)
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि या देशाचे प्रथम पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती या दोहो थोर स्वातंत्र्य पुरुष यांची जयंती ही जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात पार पाडली.
सदर प्रसंगी विद्यालयांत प्रतिमा पूजन पुष्पहार तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी जी व लालबहादूरजी शास्त्री जी यांना विनम्रपणे अभिवादन केले. विद्यार्थ्यांनि दोन्ही नेत्यांच्या जीवनप्रवास याचा मागोवा घेत भाषणे केली. तसेच महात्मा गांधीजीची असणाऱ्या वेशभूषा या विद्यालयातील विद्यार्थ्यांनि केल्या व लोकसंदेश पर प्रभातफेरी ही आवरे गावात काढण्यात आली.
सदर प्रभात फेरी दरम्यान आवरे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या पालकवर्गनि आनंद व्यक्त केला तसेच या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यालयातील विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे मध्ये महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी झाली




Be First to Comment