
कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
उलवे, ता. ४: कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर तालुका आणि खोपोली शहर कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक खोपोली येथे पार पडली. तिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मलाही अनेक राजकीय पक्षांच्या ऑफर्स आल्या, पण सर्व नाकारल्या आणि कॉंग्रेसच्या विचारांशी ठाम राहिलो. आता ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आत्मविश्वास वाढवा आणि लोकांपर्यंत जा. कॉंग्रेसचा हात सबके साथ, हे सर्वसामान्यांना पटवून द्या.”
यावेळी झालेल्या चर्चेत अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की, सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करून तरुणांना पक्षाशी जोडावे लागेल, यंदा खोपोलीमधून सात ते आठ नगरसेवक निवडून येऊ शकतात, अशीही आशा यावेळी व्यक्त केली गेली.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखिल ढवळे, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, खालापूर तालुका अध्यक्ष देविदास म्हात्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





Be First to Comment