
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीन महिन्यांच्या आत दी बा पाटील यांचे नाव देण्याची दिली ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे हे आज 100% स्पष्ट झाले आहे. आज मुंबई येथील सह्याद्री अतिगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती च्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले जाणार असल्याचा पुनरुचार केला.

आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडवणीस यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की, मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत पंतप्रधानांनी मला तीन महिन्यात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आता दुसरे कोणते नाव या विमानतळाला लागेल हा प्रश्नच उरला नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीवरून समितीचे सर्व सदस्य समाधानी झाले असून आता यापुढे कोणत्याही आंदोलन करण्याची गरज नाही असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे दि बांच्या नावाचा हा लढा यशस्वी झाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे हे म्हटले आहे.
या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे वने मंत्री गणेश नाईक, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार राजू पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, कॉम्रेड भूषण पाटील, संतोष केणे, नंदराज मुंगाजी, यांच्यासह सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Be First to Comment