
शासनमान्य जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा२०२५-२६ खोपोली येथे संपन्न
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवासंचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धा कारमेल कॉन्व्हेंट स्कूल – खोपोली येथे संपन्न झाली आहे. या स्पर्धेत 15 तालुक्यातील 350 हून अधिक कुस्तीपटूनी सहभाग घेऊन विभागीय स्तरांवर आपली निवड व्हावी या उद्देशाने आपले कौशल्य पणाला लावले. पहिल्या दिवशी मुलींच्या तर दुसऱ्या दिवशी मुलांच्या स्पर्धा संपन्न झाल्या.
स्पर्धेच्या उदघाटन समारंभा समयी खोपोलीतील युवा उधोजक तथा काशी स्पोर्ट्स सेंटरचे विक्रम यशवंत साबळे, खोपोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, खोपोली पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक सुरेश गागरे, खोपोली शहरातील विवीध शाळांच्या मुख्याध्यापकांमध्ये सिस्टर निर्मल मारिया, गौरव तिवारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भगवान धुळे, जयेंद्र भगत, तांत्रिक सचिव तथा स्पर्धा प्रमुख राजाराम कुंभार, खोपोलीचे माजी नगरसेवक महादू जाधव, खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, खातशिप्रचे सचिव किशोर पाटील, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे गुरुनाथ साठेलकर आणि प्रमोद भगत इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता खालापूर तालुका समनव्यक जगदीश मरागजे, क्रीडा शिक्षक समीर शिंदे, अमित विचारे, जयश्री नेमाणे, दिवेश पालांडे, धनश्री गौडा यांनी खूप मेहनत घेतली. स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच सावळेराम पायमोडे, रोशनी परदेशी, विनोद जाधव यांनी मोलाची कामगिरी बजावली. वेध मरागजे, क्षितिजा मरागजे, सुशील पावशे, प्राण भगत, हंसिका कुंभार या कुस्तीपटूंच्या कुस्त्या प्रेक्षणीय ठरल्या.
खोपोली पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक तथा राष्ट्रीयस्तरावर किर्तीमान प्रस्थापित केलेल्या रोप मल्लखांब खेळाडू पूजा चव्हाण यांच्या हस्ते विविध वय आणि वजनी गटातील विजेत्या कुस्तीगिरांना पदक व शासनाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील विजयी खेळाडू मुंबई विभागीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांवर विविध स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




Be First to Comment