Press "Enter" to skip to content

नवीमुंबई विमानतळाला दिबांचेच नाव मिळणार

पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेला केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्य मंत्री मोहोळ यांचे ठोस आश्वासन

पुणे : राज भंडारी

पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या वतीने विमानतळाला दिबांच्या नावासाठी आज पुणे येथे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली असता ना. मोहोळ यांनी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे ठोस आश्वासन दिले. यावेळी ना. मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाच्या प्रस्तावाचा आधार घेत, दि. बां.च्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचेही सांगितले. रविवारी पुणे येथे ना. मुरलीधर मोहोळ यांची पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता त्यांनी पत्रकारांना आश्वासित केले.

यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. तसेच यापुढेही मुंबई मंत्रालयावरील पायी मोर्चा, दिल्ली येथे केंद्रीय नागरी व उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेऊन येत्या ८ ऑक्टोबर रोजी विमानतळाच्या उदघाटनापूर्वी विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव जाहीर करण्याबाबत निवेदन देण्याचेही योजले असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

सदरची भेट घडवून आणण्यासाठी म्हाडाचे मा. सभापती बाळासाहेब पाटील तसेच आमदार विक्रांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे जेष्ठ पत्रकार विजय कडू, विवेक पाटील, निलेश सोनावणे, सय्यद अकबर, रत्नाकर पाटील, संजय कदम, केवल महाडिक, राज भंडारी, प्रकाश म्हात्रे, विशाल रावसाहेब सावंत, अनिल कुरघोडे, रविंद्र गायकवाड, साबीर शेख, गौरव जहागीरदार, गणपत वारगडा, सनिप कलोते, क्षितिज कडू, शंकर वायदंडे, सुभाष वाघपंजे, राम बोरीले, सुनील वारगडा, आशिष साबळे, महिला सदस्य रुपाली शिंदे, दिपाली पारसकर, सुमेधा लिम्हाण आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.