
पेण, ता. २५ (वार्ताहर) : स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत मैत्री क्लिनिक अलिबाग मार्फत पेण येथील सार्वजनिक विद्यामंदिर शाळेतील मुलींसाठी सखी सावित्री समितीच्या वतीने समुपदेशन व जाणीव जागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या किशोरवयीन आरोग्य समुपदेशिका अपर्णा करंदीकर यांनी सांगितले की किशोरवयीन वयामध्ये मुलींनी आवश्यक असलेले अन्नघटक व पोषक आहार वेळेवर करणे आवश्यक असून यामुळेच आपल्या अंतर्गत अवयवांची रचना स्पष्ट होते तसेच या वयात मुलींना काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यांनी तात्काळ आपल्या आईला, बहिणीला सांगितले पाहिजे.
यावेळी सावित्री समितीच्या अपर्णा कोळी, संस्थेचे अध्यक्ष पी.डी.पाटील, मुख्याध्यापक एस.एच.नाईक, पर्यवेक्षक एस.एस.मोरे, शिक्षक प्रतिनिधी अपर्णा कोळी, शिक्षिका सदस्य कविता जोशी, आदि
सदस्य उपस्थित होते.




Be First to Comment