
सीएफआय संस्था शैक्षणिक, सामाजिक कार्यात अग्रेसर – खासदार धैर्यशील पाटील
पेण, ता. २४ (वार्ताहर) : सीएफआय ही संस्था नॉर्वेच्या माध्यमातून फंडिंगद्वारे चालत असताना या संस्थेने आजवर पेण तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांना तसेच सामाजिक कार्याला अग्रेसर ठेवले असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी बोलून दाखविले.
पेण शहरातील उत्कर्ष नगर येथे सीएफआय संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.या कार्यक्रमाला सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, सीएफआय संस्थेचे अध्यक्ष संदेश म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी डॉ.किशोर देशमुख, जि.प. माजी सभापती डी.बी.पाटील, कृ.उ.बा. समिती सभापती महादेव मानकर, उद्योजक उदय साठे, माजी नगरसेवक दिलीप लाड, दीपक गुरव, प्रकाश शिंगरुत, सदानंद पवार, दयानंद भगत, दशरथ देशमुख, सचिन शिगवण, मंगेश म्हात्रे आदिंसह विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

तर आमदार रविशेठ पाटील म्हणाले की सीएफआय संस्था मागील अनेक वर्षापासून पेणमध्ये कार्यरत असून ती योग्यरित्या पार पाडण्याची जबाबदारी डॉ.देशमुख यांनी आजवर पाडली आहे. संस्थेने असंख्य विद्यार्थ्यांना मदतीचा हातभार दिल्याने यामुळेच आज ते विविध उच्च स्तरावर पोहोचू शकले आहेत.त्यामुळे संस्थेचे काम हे खऱ्या अर्थाने वाखण्याजोगी असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेला गत वैभव प्राप्त झाले असून येणाऱ्या काळात संस्था अधिक जोमाने काम करणार असल्याचे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी डॉ.किशोर देशमुख यांनी सांगितले.यावेळी संस्थेने हातभार लावून घडविलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.




Be First to Comment