
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे – पनवेलच्या पत्रकारांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट
मुंबई : आण्णासाहेब आहेर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव मिळावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पनवेल तालुका पत्रकार एकत्रितरण संस्थेतील पत्रकारांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदास आठवले यांची बुधवार दिनांक २४,सप्टेंबर रोजी मुंबई येथील नंदगिरी गेस्ट हाऊस या ठिकाणी सायंकाळी भेट घेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याबाबत निवेदन देण्यात आले


या भेटीदरम्यान पत्रकारांनी विमानतळाचे नामकरण हा केवळ प्रशासकीय मुद्दा नसून भूमिपुत्रांच्या भावनांचा व न्यायाचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले. दि.बा.पाटील यांनी नवी मुंबईच्या भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी केलेल्या त्यागमय संघर्षाची माहितीही देण्यात आली.
पत्रकारांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेत मा.रामदास आठवले यांनी तत्काळ केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा.मुरलीधर मोहळ यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला.उद्घाटना आधीच विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत त्यांनी चर्चा केली व या मागणीचा सकारात्मक पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने रामदास आठवले यांचे आभार मानले
सदर भेटी प्रसंगी जेष्ठ पत्रकार विजय कडू,सय्यद अकबर निलेश सोनावणे,विवेक पाटील,संजय कदम यांच्यासह केवल महाडिक,शंकर वायदंडे,गौरव जाहगीरदार,लालचंद यादव,गणपत वारगडा,चंद्रकांत शिर्के,आण्णासाहेब आहेर,शैलेश चव्हाण,विशाल सावंत,भूषण साळुंके,दीपक घरत,राम बोरीले यांची उपस्थिती लाभली




Be First to Comment