
कामोठे : प्रतिनिधी
पनवेल महानगर पालिकेने पनवेल क्षेत्रात रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी खर्च केले आहेत त्यामध्ये कामोठे मध्ये 10 कोटी खर्च केले असले तरी देखील कामोठे मध्ये खड्डेच खड्डे चोहीकडे असे रस्ते आहेत. अनेकांनी पालिकेला वेळोवेळी निवेदने देऊनही पालिका मात्र पावसाकडे बोट दाखवत आहेत. संपूर्ण गणोत्सव खड्ड्यातून मार्ग काढत साजरा झाला, तरी देखील पालिकेने फक्त चार-पाच मजूर लावून तात्पुरती रस्तेवरील खडी साफ करण्याचे काम सुरु करून पुन्हा येरे माझ्या मागल्या..
खड्ड्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत.दुसरेकडे खड्ड्यांच्या बाजूला राजकीय नेत्यांच्या उत्सवाच्या कमानी पाहून सर्वसामान्य नागरिक रोष व्यक्त करत आहेत
पालिकेच्या डिसाळ कारभाराला कंटाळून 10 दिवसा पूर्वी एकता सामाजिक संस्थेने खडी साफ केली होती. तरीही पालिकेला काहीही फरक पडला नाही, त्यामुळे सर्वपीत्री अमावस्याच्या दिवशी कामोठे पोलीस स्टेशन समोरील चौकात पालिकेच्या रस्ते व बांधकाम खात्याचा निषेध म्हणून एकता सामाजिक संस्थेने या विभागाचे फलक लावून श्राद्ध घातले, सोबत चार आणे हे नाणे ठेवून निषेध व्यक्त केला.
यावेळी अमोल शितोळे, सचिन त्रिमूखे, प्रशांत कुंभार, ऍड. समाधान काशीद, अरुण जाधव, त्रिशा घोडे, उमेश गायकवाड, संगीता पवार आदी उपस्थित होते. येणारे जाणारे नागरिक मात्र उत्सुकने पाहत होते




Be First to Comment