
“प्रितम म्हात्रेंच्या हस्ते नगरसेविका सारिका भगत यांच्याकडून धान्यकिट वाटप”
पनवेल – नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहल्ला परिसरातील अनेक कुटुंबांवर संकट कोसळले. घरात पाणी शिरल्याने संसाराची धावपळ ठप्प झाली, तर महिलांना जेवणासाठी आवश्यक साहित्याच्या टंचाईचा मोठा सामना करावा लागला. या कठीण प्रसंगात सामाजिक बांधिलकी जपत तसेच नागरिकांच्या वेदना ओळखत नगरसेविका सौ. सारिका भगत यांनी पुढाकार घेतला.
सौ.भगत यांनी महिलांच्या घरगुती गरजांचा विचार करून तांदूळ, डाळ, साखर, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले धान्यकिट पूरग्रस्त नागरिकांना वाटले. हा उपक्रम केवळ मदतकार्य नसून “आपण संकटात एकटे नाही” हा दिलासा देणारा हात होता.
या प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मा. नगरसेविका सौ. सारिका भगत, डॉ. सौ. सुरेखा मोहोकर, सौ. प्रीती जॉर्ज, मा. नगरसेवक श्री. मुकित काजी उपस्थित होते.
अचानक आलेल्या संकटसमयी दाखवलेली ही कळकळ नागरिकांच्या डोळ्यांत समाधानाश्रू आणणारी ठरली. समाजासाठीची ही खरी बांधिलकी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
“नगरसेविका सारिका भगत स्वतः एक गृहिणी असल्याने महिलांना घरगुती गरजा भागवण्यासाठी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे त्यांना चांगले ठाऊक आहे. संकटाच्या काळात महिलांना दिलासा देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न त्यांनी केला आहे, तो नक्कीच अभिमानास्पद आहे. पूरग्रस्त ठिकाणाचे शासकीय पंचनामे झाले आहेत; लवकरच मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
– प्रितम जनार्दन म्हात्रे,
मा. विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका




Be First to Comment