
पनवेल : प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे नुकतेच पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये इको बिट्स या वाद्यवृंदाचे आयोजन आपल्या विविध उपक्रमांसाठी निधी जमा करण्यासाठी केले होते.
विशेष म्हणजे या वाद्यवृंदामधील सर्व कलाकार हे दृष्टीहीन होते. दोन आवाजात गाणारे श्रवण कुमार हे या कार्यक्रमाचे मोठे आकर्षण होते. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध हिंदी मराठी गीते सादर करुन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना मोहुन टाकले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला सरगम क्लबचे अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा यांनी क्लबच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रांतपाल संजीव सुर्यवंशी, प्रथम प्रांतपाल प्रवीण सरनाईक, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे,लायन्स डिस्ट्रिक्टचे खेमंत टेलर, आर पी पांडे,सत्यपाल चूघ,धर्मपाल चूघ , सुयोग पेंडसे आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच पनवेल लायन्स चे अशोक गिल्डा, एस जी चव्हाण, न्यू पनवेल स्टील टाऊन चे गैरोला, ठाकरे, वाय पी सिंग, द्रोणागिरी क्लबचे भूमिका सिंग, सागर चौकर, मोनिका चौकर हे सुद्धा उपस्थित होते.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ कामगार नेते महेंद्र ठाकूर, मा. नगरसेवक नितीन पाटील यांनी आपले शुभेच्छा संदेश पाठवले होते.
पनवेलकर रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरगम क्लबचे सचिव आदित्य दोशी, खजिनदार धवल शहा, संजय गोडसे, स्वाती गोडसे, मानदा पंडित, अल्केश शहा, अनिल परमार, जयेश मणियार, राजेंद्र महानुभाव, संध्या महानुभाव, मिलिंद जोशी, ओंकार खेडकर, संविदा पाटकर, सुषमा पन्हाळे, महेंद्र लोहार, अश्विनी खेडकर यांनी खूप परिश्रम घेतले.




Be First to Comment