
क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त नवदुर्गाचा करण्यात येणार सन्मान
पनवेल / प्रतिनिधी
शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे पनवेल कार्यक्षेत्रातील ९ दुर्गाचा महासन्मान व स्त्री शक्तीचा जागर करण्यात येत आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवशी नवदुर्गेचा सन्मान करण्यात येणार असून यामधे पनवेल कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र शासन, पोलिस प्रशासन,पालिका प्रशासन, तसेच कला,क्रीडा,राजकिय, सामाजिक, शैक्षणिक,पत्रकार अशा ९ क्षेत्रातील नामवंत स्रीशक्तीचा आम्ही जागर करीत आहोत व त्यांचा सन्मान करणार आहोत अशी माहीती क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. रुपालीताई शिंदे यांनी दिली. या उपक्रमासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क : ८६५२४१४३४३, ७४००४०४३४२, ९२२४२०९१८८ करण्याचे आवाहन रुपालीताई शिंदे यांनी केले आहे.




Be First to Comment