
नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट वाटप उपक्रम
पनवेल दि.१९ (संजय कदम) : रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने पटेल इंजिनीअरिंग कंपनी, खारपाडा यांच्या सौजन्याने नवी पनवेल वाहतूक शाखेत सुरक्षित प्रवासाची हमी देणारे वाहतूक पोलीस अंमलदार आणि नागरिकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे सुरक्षित प्रवासाचे महत्त्व अधोरेखित होत असून, वाहतूक नियमांचे पालन करण्याचा चांगला संदेश समाजात पोहोचला आहे.
या कार्यक्रमाला नवी पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत खराटे यांनी उपस्थित राहून वाहतुकीच्या नियमांचे पालन व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी नागरिकांना अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर अनिवार्य असल्याचे सांगितले आणि “आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे” असा संदेश दिला. यावेळी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे प्रोजेक्ट हेड श्री. कुलकर्णी, डेप्युटी हेड सेनगुप्ता यांच्यासह कंपनीचा स्टाफ, वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. हेल्मेट वाटप कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती झाली असून, हा उपक्रम समाजात एक आदर्श ठरत आहे.




Be First to Comment