

पनवेल दि.१९ (संजय कदम) : पनवेलच्या ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र या संस्थेचाहितचिंतक मेळावा’ उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला माजी पत्रकार व ॲनलाझर ʼ या युट्यूब चॅनलचे संपादक सुशील कुळकर्णी प्रमुख वक्ता लाभले होते. या कार्यक्रमाला पनवेलमधील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दीप प्रज्वलन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहर अध्यक्ष सौ. अश्र्विनी मुळे यांनी प्रास्ताविक केले. कुलाबा जिल्हाध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी वनवासी कल्याण आश्रम संस्था पनवेलनजीक करत असेल्या कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर एकनाथ वाघे व सुदाम पवार या चिंचवलीच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सुशील कुळकर्णी यांनीतू मै एक रक्त ʼ या घोषवाक्याचा व पौराणिक-ऐतिहासिक संदर्भाचा आधार घेत, वनवासी क्षेत्रातील नागरी समाजाच्या कार्याची आवश्यकता आणी निकड, अत्यंत प्रभावीपणे सोप्या भाषेत विषद केली. हा मेळावा उपस्थितांकरता एक वेगळ दृष्टीकोन देणारा अनुभव होता. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



Be First to Comment