

पेण, ता. १८ (वार्ताहर) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्मात आषाढ ते अश्विन पौर्णिमा ही पवित्र मानली जात असून या तीन महिन्याच्या कालावधीत वर्षावास मालिका सुरू असते यानिमित्ताने देशभरात होणाऱ्या प्रचार आणि प्रसारात बुद्ध धम्माचे विचार हे समाजाला प्रगतीपथावर नेणारे असल्याचे प्रतिपादन प्रा.एल.एन कुमार यांनी अंतोरे येथे बोलताना सांगितले.भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत पेण शाखेच्या वतीने वर्षावासाचे १३ वे पुष्प कार्यक्रम अंतोरे येथील बुद्ध विहारात आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय प्रवचनकार बंडू कदम, खोपोली तालुकाध्यक्ष कृष्णा मोरे, बौद्ध महासभा पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, वंचितचे तालुका अध्यक्ष सुनील धामणकर, निवृत्त शिक्षक चंद्रकांत कोळी, पत्रकार राजेश कांबळे, स्वप्निल पाटील, संजय गायकवाड, समिर घायतले, प्रसाद अडसुळे, मानसी कांबळे, रोहिणी अडसुळे, नैतिक कांबळे, सचिन कांबळे, नरेश गायकवाड, सुनिल शिंदे, रमेश गायकवाड, आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.तर यावेळी प्रवचनकार बंडू कदम यांनी बुद्ध धम्माची तत्वे त्याचे आचरण कसे असावे याबाबतची माहिती उपस्थितांना दिली.यावेळी कार्यक्रमा निमित्ताने आलेल्या मान्यवरांचे राजेश कांबळे, प्रसाद अडसुळे यांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.




Be First to Comment