
पनवेल (प्रतिनिधी) –
ग्रामीण, आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवण्यासाठी कौतिके चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेण्यात आला.
दि. १३ सप्टेंबर २०२५, रोजी सकाळी १०:३० वाजता, जिल्हा परिषद शाळा, महोदर (ता. पनवेल, जि. रायगड) येथे आयोजित कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिली यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे.
कौतिके चॅरिटेबल फाउंडेशन ही संस्था यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे ग्रामीण विकासासाठी कार्यरत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढण्यास मदत होते, तसेच त्यांचा आत्मविश्वासही वृद्धिंगत होतो.
कार्यक्रमावेळी फाउंडेशनचे सदस्य विजय जाधव, सतीश जाधव, संतोष जाधव, जयश्री सुतार, निलेश कुटे, अभिषेक सिंग, अभिनय सिंग, ज्ञानेश्वर जाधव, सुमन यादव, प्रवीण गोळे, ज्ञानेश्वर सकपाळ, आकाश मिश्रा व अन्य सहकारी उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
कौतिके चॅरिटेबल फाउंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम अन्य संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.




Be First to Comment