
खांब,दि.१४(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या गावची सुकन्या असणारी आराध्या अमिता गजानन बामणे हिने तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत अंतिम टप्प्यात यशस्वी कामगिरी करून विजेतेपद पटकावले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व जिल्हा क्रीडा परिषद रायगड यांच्या वतीने रोह्यातील धाटाव येथील क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धीबळ स्पर्धेतील शालेय गटात आराध्या बामणे हिने अंतिम टप्प्यात यशस्वी कामगिरी करून सुयश संपादित करून जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत तिची निवड करण्यात आली आहे.आराध्या अमिता गजानन बामणे हि तालुक्यातील ग्रिगोरिअन पब्लिक स्कूल किल्ला येथील गुणवंत व हुशार विद्यार्थीनी असून अभ्यासाबरोबरच सर्व बाबतीत ती नेहमीच आघाडीवर असते.तिचे वडील धाटाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत तर आई ही प्राथमिक शिक्षिका आहे.
आराध्याच्या या सुयशाबद्दल तळवली तर्फे अष्टमी ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच तरूण मंडळ यांच्या वतीने तसेच समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींकडून अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.




Be First to Comment