
पनवेल ता.14( बातमीदार) मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे आणि शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे तुषार जाधव आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माधव एरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षप्रवेशावेळी उपस्थित शिवसैनिकांनी नवागत कार्यकर्त्यांचे उत्साहाने स्वागत केले.
या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, “कळंबोलीत शिवसेनेची पकड अधिक मजबूत करण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण ठरेल. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांची साथ मिळणे ही संघटनेसाठी सकारात्मक बाब आहे. तुषार जाधव, महादेव एरोळे यांच्यासह ऋतिक कुंभार, प्रशांत पाटील, पियुष तिवारी, अब्दुल शेख, विशाल बोराडे यांनी प्रवेश केला
कार्यक्रमाला विभाग प्रमुख निलेश दिसले रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, आनंद माने सरकार, विशाल सपकाळ, नारायण पिलाने, सुधीर ठोंबरे, प्रेम गोडसे यांच्यासह अनेक शिवसैनिक नागरिक उपस्थित होते.




Be First to Comment