
सिडको कार्यक्षेत्रातील पूर्वाश्रमीच्या BMTC कर्मचाऱ्यांना 10 लाख आर्थिक मोबदला देण्याच्या आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश; लवकरच आर्थिक मोबदल्याच्या चेकचे होणार वाटप
मुंबई : प्रतिनिधी
सिडको कार्यक्षेत्रातील पूर्वाश्रमीच्या BMTC कर्मचारी हे १९८४ पासून बससेवा बंद झाल्याने निराधार झाले होते. त्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळावा म्हणून कर्मचारी व विविध संघटना अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. परंतु तरीही ४२ वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता.
सदर विषयात आमदार विक्रांत पाटील यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून सिडको तसेच इतर संबधीत अधिकाऱ्यांशी आवश्यक पाठपुरावा केला व त्यासाठी आवश्यक विशेष बैठकांच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली. सिडकोकडून हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे अंतिम मान्यतेसाठी येणे, अप्पर मुख्य सचिव श्री. असीम गुप्ता यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यास प्रयत्न करणे, यामुळे आता अंतिमत: ६३१ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा मोबदला मिळण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
लवकरच पूर्वी PF व ग्रॅज्युईटी मिळालेल्या या ६३१ कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांच्या चेकचे वाटप सिडकोच्या माध्यमातून केले जाणार आहे तसेच एकूण कर्मचाऱ्यांपैकी उर्वरित असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील लवकरच मोबदला मिळण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा जलदगतीने सुरू आहे.




Be First to Comment