
मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरीकांनी याचा लाभ घ्यावा – ॲड.मंगेश नेने
पेण, ता. १२ (वार्ताहर) : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, अमृत या महाराष्ट्र शासनाची स्वायत्तता संस्था आयोजित खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, सिंधी, कच्ची, पाटीदार, राजपूत आदि प्रवर्गासाठी दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी अमृत मेळाव्याचे आयोजन पेण भाऊसाहेब नेने महाविद्यालय सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे व वक्ते ॲड.बापूसाहेब नेने, बँक ऑफ इंडिया पेण ब्रांच मॅनेजर सौरभ पणशीकर उपस्थित राहणार आहेत.सदर मेळाव्यात उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक कर्ज लाभ या योजनांची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन संबंधित अधिकारी वर्गाकडून होणार आहे.याकरीता ॲड. मंगेश नेने ९९७५००७६००, अमृत रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे ९११२२२७८५९, अमित सामंत कोकण विभाग व्यवस्थापक ८२७५४५५४६५ तसेच महेश हेलवाडे पेण ब्राह्मण सभा ९७६४९०३५९८ यांची संपर्क साधून मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मेळाव्याचे निमंत्रक ॲड.मंगेश नेने यांनी केले आहे.




Be First to Comment