
शेकडो विद्यार्थ्यांनी केली जोहेचा राजाची पहिली महाआरती
पेण, ता.12 (प्रतिनीधी) -: गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब जोहे गावात साखरचौथ निमित्त जोहेचा राजाची पाच दिवसांसाठी स्थापना करण्यात आली आहे. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या न्यू इंग्लिश जोहेच्या शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग यांच्या हस्ते जोहेच्या राजाची पहिली महाआरती संपन्न झाली.
वर्षभर गणेश मूर्ती बनविण्यात पेण तालुक्यासह जोहे गावातील जेष्ठ, महिला व युवा वर्ग व्यस्त असतो. मात्र श्रीगणेश चतुर्थी गणेशोत्सव झाल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीला विशेषतः पेण, पनवेल, उरण आदी तालुक्यात घरगुती व सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साखरचौथ गणपती सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 2013 साली स्थापन झालेल्या व शाळेय विद्यार्थी दत्तक घेणे, महिलांसाठी वेगवेगळे शिबीर, रक्तदान शिबिर आयोजित करणे आदी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जोहेचा राजा प्रतिष्ठान तर्फे गणेश मूर्तीचे हब म्हणून ओळख असलेल्या जोहे गावात दरवर्षी प्रमाणे पाच दिवसांसाठी साखरचौथ गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य विद्यार्थी घडविणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश जोहेच्या शेकडो विद्यार्थ्यांना जोहेचा राजाच्या पहिल्या महाआरतीचा मान देण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य उत्तम गलांडे व विद्यार्थी यांच्या हस्ते राजाची महाआरती संपन्न झाली. याप्रसंगी गायक लावण्या महेश पाटील हिच्या सुमधुर आवाजाने व पार्थ सागर पाटील याच्या टबलाच्या साथीने राजाची महाआरती घेण्यात आली. उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना प्रतिष्ठान तर्फे वही, पेन, आरती संग्रह व खाऊ वाटप करण्यात आला.
या महाआरतीस प्राचार्य उत्तम गलांडे, विनोद पन्हाळकर, अभिजित पाटील, संतोष घरत, गवळी, जोहेचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक देवा पेरवी, अध्यक्ष नारायण म्हात्रे, कार्याध्यक्ष विनोद म्हात्रे, वैभव धुमाळ, कमलाकर बोरकर, रवींद्र रसाळ, धनंजय पाटील, दीपक पाटील, निनाद धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.




Be First to Comment