

पेण मध्ये जनसुरक्षा कायद्या विरोधात सर्वपक्षीयांकडून सह्यांची मोहीम
पेण (वार्ताहर) : महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक २०२४ राज्य सरकारने हा कायदा विधिमंडळाच्या अधिवेशनात बहुमताच्या जोरावर पारित केला असला तरी हा कायदा जनतेसाठी तसेच घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक असल्याने या जनसुरक्षा कायद्याविरोधात आज राज्यभर आंदोलन होत असताना पेणमध्ये सुद्धा सर्वपक्षीयांकडून नगरपालिका चौकात सह्यांच्या मोहिमेद्वारे आंदोलन करण्यात आले.
यावेळी ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांनी सांगितले की केंद्रासह राज्यातील सरकार जनतेच्या हिताची कामे न करता त्यांना वेटीस धरण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करत असून सरकारच्या या धोरणाला जनता आता कंटाळलेली आहे.त्यामुळे परीत केलेला जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या हक्कांची गळचेपी करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनाला काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, संतोष ठाकूर, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, जगदीश ठाकुर, शहर प्रमुख सुहास पाटील, कासू विभाग प्रमुख गजानन मोकल, शेकापचे ॲड.रोशन पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल, शहराध्यक्ष प्रवीण पाटील, राष्ट्रवादी (श.प.गट) प्रकाश मोकल सूर्यकांत पाटील, योगेश पाटील, विनोद म्हात्रे, संदीप रेणुका पाटील, रवींद्र मोकल, हिराजी चौगले, निलेश म्हात्रे, हिदु कुवारे आदिंसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अनेकांकडून जनसुरक्षा विरोधात सह्या करण्यात आल्या.




Be First to Comment