Press "Enter" to skip to content

नागोठणे पोलिसांच्या कामगिरीबद्दल बद्दल नागोठणे ग्रामपंचायती कडून सत्कार

नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद

नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत दि.२१/०८/२०२५ रोजी २१.१५ वाजण्याचे सुमारास महामार्ग पोहवा/९६२ वाघ व पत्रकार महेंद्र म्हात्रे असे वरवठणे येथील जुना अंबा नदी पुलाजवळ असताना एक महीला हीने वरवठणे येथील जुन्या पुलावरून अंबानदीचे पाण्याचे भरलेल्या पात्रात उडी मारली.

सदरची माहीती तात्काळी पोहवा ९६२ वाघ यांनी नागोठणे पोलीस ठाणे येथे कळविल्यानंतर तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी तसेच पोहवा/८५६ लांगी व पोकॉ/१०७१ भालेराव असे पोहवा/९६२ वाघ याचे समवेत खाजगी वाहनाने सदर पाण्याचे प्रवाहाचे सुमारे २०० मीटर पुढे असलेल्या रिलायन्स चौक येथील रस्त्यावरील पुलाचे खालील पाण्याचे प्रवाहाच्या साईडप‌ट्टीला उतरून आमचे पैकी पोहवा /९६२ वाघ व पोकॉ/१०७१ भालेराव यांनी नदीच्या प्रवाहामध्ये उडया मारून त्यांना सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पोहवा/८५६ लांगी यांनी रस्सीने सहायाने मदत करून सदर पाण्यात उडी मारलेल्या महीलेल्या रस्सीच्या सहायाने पाण्यातुन खेचुन बाहेर काढून तिचे प्राण वाचविण्याचे कार्य केलेले आहे.

त्यानतंतर तिचेवर दवाखान्यामध्ये नेवुन औषधोपचार करण्यात आले असुन सदर महीलेचे नाव सौ. आशा दिपक गुंजाळ वय-२५ वर्षे रा. रामनगर नागोठणे ता. रोहा असे असुन तीने घरगुती भांडणावरून नदीची पत्रामध्ये उडी मारून स्वतःला संपविण्याचा विचार केला होता तीस समोपदेशन करून तिचे पती दिपक गुंजाळ यांचे ताब्यात दिली आहे. सदर वेळी सदर महीलेचा प्राण वाचविण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पोहवा/८५६ महेश लांगी, पोहवा /९६२ सुनिल वाघ महामार्ग पोलीस, पोकॉ/१०७१ स्वप्नील भालेराव या सर्व पोलिसांनी सर्वोकृष्ट कामगिरी केल्या बद्दल नागोठणे ग्रामपंचायतीने पोलिसांना नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात आमंत्रित करून स्वर्गीय शैलेंद्र देशपांडे सभागृहात दिनांक ०९/०९/२०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता शाल श्रीफळ देऊन सरपंच सौ सुप्रिया महाडिक उपसरपंच अखलाक पानसरे ग्रामविकास अधिकारी टेमघरे प्रथम लोक नियुक्त माजी सरपंच मिलिंद धात्रक यांच्या शुभ हस्ते सन्मान व सत्कार केला

त्यावेळी नागोठणे ग्रामपंचायतचे सरपंच सौ सुप्रिया महाडिक उपसरपंच अखलाक पानसरे ग्राम विकास अधिकारी टेमघरे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिलिंद धात्रक नागोठणे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे वकील प्रकाश कांबळे आनंद लाड सज्जाद पानसरे मुसदीक पोत्रीक तसेच ग्रामपंचायतचे सदस्य व कर्मचारी रवींद्र जोशी प्रमोद चौगले अमोल ताडकर संतोष जोशी दिलीप तेलंगे उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.