
नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद
नागोठणे पोलीस ठाणे कडून आपले लाडके बाप्पा गणपतीचा अकरा दिवस भक्ती पूजा अर्चा नंतर करून अनंत चतुर्थीच्या दिवशी रविवारी रात्री गणपती विसर्जनाची मिरवणूक फटाक्याच्या आतषबाजीने ढोल ताशाच्या वाद्यात गाजत वाजत निघाली होती.
नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासहित पुरुष पोलीस व पोलीस महिला यांनी नागोठणे पोलीस ठाणे बाजारपेठ मार्गाने छत्रपती शिवाजी चौक मार्गाने आंबा नदीच्या काठापर्यंत नाचत गाजत रात्री 9 वाजता आंबा नदीच्या काठावर पोलिसांनी गणपती मूर्तीची आरती केल्यानंतर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असे घोषणाबाजी देत सर्व पोलिस हे भावूक होत गणपती मूर्तीचे विसर्जन केले




Be First to Comment