
पेण, ता. ८ (वार्ताहर) : पेण तालुक्यात येत्या दहा तारखेला साजरा होणारा साखरचौथ गणेशोत्सव सर्व मंडळानी आनंदात आणि उत्साहाने तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखूनच साजरा करावा असे आवाहन पेणचे डीवायएसपी जालिंदर नालकुल यांनी सार्वजनिक गणपती मंडळांना केले आहे.
अनंत चतुर्थीच्या गणेश विसर्जनानंतर चार दिवसांनी येणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सव पेण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने त्या अनुषंगाने पेण पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळाच्या सदस्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला डीवायएसपी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे, पोलीस कर्मचारी निलेश ठाकूर, मोरे आदिंसह मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.
तर यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले की साखरचौथीचे गणपती विसर्जनासठी मंडळातील सदस्यांनी लवकर काढावेत कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी, विसर्जनाकरीता स्पिकर परवाना घ्यावा, डीजे, लेझर लाईट यांचा वापर करू नये यासह दहा वाजता स्पिकर बंद करण्यात यावे आपल्यासाठी पोलीस तत्पर आहेत.आपण गणेशोत्सव साजरा करत असताना तो आनंदाने साजरा करावा कायद्याचे कोणीही उल्लंघन करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.यावेळी उपस्थित मंडळातील सदस्यांनी स्पिकर परवान्यासाठी आपले कागदपत्रे पोलीस ठाण्यात दाखल केले.




Be First to Comment