
पनवेल, दि.8 (संजय कदम) ः ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये पनवेल जवळील पळस्पे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. याला उपाय म्हणून पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने कर्तव्यावर असताना त्या परिसरातील रस्त्याला पडलेले खड्डे बुजवून घेतल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
सध्याच्या सणासुदीच्या दिवसांमुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांची विविध पथके हे पळस्पे फाटा राहूल हॉटेल परिसर त्याचप्रमाणे मुंबई-पुणे महामार्गावर कर्तव्य बजाविण्यासाठी कार्यरत आहेत. यावेळी त्यांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे लक्षात आले. या संदर्भात त्यांनी वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः रस्त्यावर उतरुन हे खड्डे बुजवून घेण्यास सुरूवात केली. त्याचा फायदा येथून ये-जा करणार्यांना वाहन मालकांना झाला व मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी ही आता सुरळीत होताना दिसत आहे. याबद्दल चाकरमान्यांनी पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले आहेत.




Be First to Comment