
नागोठणे प्रतिनिधी : याकुब सय्यद
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकेली खिंडीच्या उतारावर रविवार दिनांक ०७/०९/२०२५ रोजी सकाळी ११:३० ते १२: वाजताच्या दरम्यान टेम्पो एसटीचा अपघात झाला. टेम्पो चालकाचा टेम्पो वाहनात पाय अडकल्याने त्याला पोलिसांनी सुरू सुखरूप बाहेर काढला तसेच पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले
रविवारी राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर माणगाव ते पेन बाजूकडे जाणारा टेम्पो क्रमांक एम. एच. ०८/ एपी १९४४ हा सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान वेगवान गतीने येत असताना सुकेळी खिंडीच्या उतारावर टेम्पो चालकाने ब्रेक जोरात दाबल्याने जागीच टेम्पो हा गोल फिरला त्यामुळे टेम्पोच्या पाठीमागून येणारी श्रीवर्धन बोरवली महामंडळाची बस क्रमांक एम एच ०६ बी डब्ल्यू ८२०३ या बसची टेम्पोला टक्कर लागल्याने अपघात झाला त्या अपघातात टेम्पो वाहन चालकाचा टेम्पो पाय अडकला.
सुकेली खिंडीच्या उतारावर टेम्पो व बस अपघाताची माहिती नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना समजताच तात्काळ त्यांनी आपल्या सहकार्यांसहित घटनास्थळी धाव घेतली टेम्पोत अडकलेले वाहन चालकाला बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले अपघात झालेले वाहनांना राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावरून पोलिसांनी सुरक्षित जागेवर बाजूला ठेवले तसेच रस्ता पुढील वाहनांसाठी सुरळीत चालू ठेवली
टेम्पो बस अपघाताची नागोठणे पोलीस ठाण्याच्या गुन्हे रजिस्टर मध्ये नोंद करण्यात आली नागोठणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत




Be First to Comment