
नागोठणे : प्रतिनिधी
नागोठणे पोलीस ठाणे कडून पत्रकार याकूब सय्यद व मुस्लिम बांधवांना गणपती सणानिमित्त आवर्जून पोलीस ठाणे कडून निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक सिराज पानसरे असिफ मुल्ला इकबाल पानसरे मुजफ्फर कडवेकर असगर सय्यद यांचे नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
मुस्लिम समाजातील लोकांना गणपती सणानिमित्त आमंत्रित करून सर्व जाती-धर्मातील लोक एकते शांतीचे प्रतीक असल्याचे गणपती बाप्पाच्या सणानिमित्त समाजात एक चांगला आदर्श व संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचे महान कार्य नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी केले आहे.
नागोठणे पत्रकार याकूब सय्यद व सिराज पानसरे असिफ मुल्ला ईकबाल पानसरे मुजफ्फर कडवेकर असगर सय्यद ह्या सर्व मुस्लिम बांधवांनी नागोठणे पोलीस प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी व पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत धन्यवाद दिले त्यावेळी पो. हा. स्वप्नील भालेराव, पो हा अथर्व पाटील उपस्थित होते.




Be First to Comment