
महेंद्रशेठ घरत यांच्या चार वर्षांच्या उत्तम कामगिरीचे सेलिब्रेशन!
उलवे : प्रतिनिधी
महेंद्रशेठ घरत यांच्या रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होऊन चार वर्षे झाली. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या काँग्रेस च्या चार वर्षांच्या उत्तम कामगिरीबद्दल जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ‘सुखकर्ता’ बंगला येथे सेलिब्रेशन करून जल्लोष साजरा केला.

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, ”सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली चांगली साथ माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या चार वर्षांत चांगले काम करता आले. अलिबाग सारख्या ठिकाणी युवकांसाठी शिबिर घेण्यात आले. ते युवकांसाठी दिशादर्शक ठरले राज्यात ते रोलमॉडेल ठरतेय. आगामी काळात काँग्रेसचेच दिवस येतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये.”

यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मार्तंड नाखवा, विनोद म्हात्रे, महादेव कटेकर, हेमराज म्हात्रे, किरीट पाटील, वैभव पाटील, मिलिंद कांदळगावकर, रेखा घरत,निर्मला पाटील, विनया पाटील, हेमंत ठाकूर, आदित्य घरत,लंकेश ठाकूर, अजित ठाकूर, तसेच असंख्य कॉंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.




Be First to Comment