
हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला वेगाने मात्र खारेपाट विभाग पाण्याविना व्याकूळ
पेण- दिनांक 4 (प्रतिनिधी) – : पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभाग गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असताना देखील हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला वेगाने जाण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून पेण तालुक्यातील जिते ते बेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील भूभागातून जलबोगदा (टनल) द्वारे प्रक्रिया सुरू केली आहे.गेल्या दोन अडीच वर्षापासून सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असून जिते ते हेटवणे धरणापर्यंत असणाऱ्या ग्राम पंचायत हद्दीतील गावांमधून करोडो रुपये खर्च करून जवळपास 300 मीटर खोल जमिनीखालून पिण्याच्या पाण्याची लाईन जलबोगदा (टनल) द्वारे उभारून सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला पाणी देण्याचा प्रकल्प गेल्या दोन अडीच वर्षापासून येथे सुरू केला आहे.मात्र या प्रकल्पाकरीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून ही पाईपलाईन तसेच खोदकाम केला जात आहे त्या शेतकऱ्यांना याबाबतचा मोबदला मिळाला आहे का तसेच येथील येथील शेतकऱ्यांना या जलबोगद्याची पुर्व कल्पना दिली गेली आहे का या सर्व गोष्टी अंधातरीत येत आहेत.त्यातच येथे होत असलेल्या खोदकामाबाबत शासनाची रितसर रॉयल्टी भरली आहे का हे पाहणे येथील शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे.
पेणच्या खारेपाटातील जनता हेटवणे धरणाच्या मुबलक पिण्यासाठी वर्षानुवर्ष लढा देत असताना त्यांना आजतागायत हे पाणी मिळाले नाही मात्र नवी मुंबईसाठी हेटवणे धरणाचे पाणी जलबोगद्याद्वारे अधिक वेगाने जाण्यासाठी प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे.
हेटवणे धरणाचे पाणी खारेपाटाच्या जनतेसाठी मिळावे यासाठी वर्क ऑर्डर काढणे आवश्यक असताना सिडको करिता ऐवढी घाई का ? तसेच पनवेलचे लोकप्रतिनिधी सिडकोच्या पाण्यासाठी भांडतात मात्र येथील लोकप्रतिनिधी निद्रा अवस्थेत आहेत.त्यातच 2018 च्या धरण बचाव कायद्यानुसार धरण क्षेत्र परिसरापासून 200 मीटर अंतरावर कोणतेही खोदकाम करू नये असे असताना देखील येथे खोदकाम होणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन करणारे आहे.
नंदा म्हात्रे – सामाजिक कार्यकर्त्या पेण
हेटवणे ते जिते अशी भूभागातून पाईपलाईन जात आहे.याबाबत बेलवडे येथील सर्वे नंबर 238 यातील उत्खनन बाबत शासनाची रॉयल्टी भरलेली आहे यात 2 हजार ब्रास झाले असून 500 प्रमाणे चार टप्प्यात रॉयल्टी फाडली जात आहे.यात 12 लाख रुपये महसूल जमा झाला पुढील पाचशे ब्रास रॉयल्टी देण्याचे काम चालू आहे.यातील एक बाजुच्या प्लॉटमध्ये उत्खनन झाले नसून दुसऱ्या मालकाच्या जागेतील उत्खनन बाबत रॉयल्टी फाडण्यात आली आहे.याचा धोका हेटवणे धरणाला नसून येथे ब्लास्टिंग होत नाही.
नरेश पवार- वरिष्ठ लिपिक तहसील कार्यालय पेण




Be First to Comment