
रोहा : समीर बामुगडे
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात “गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार” हा मानाचा सन्मान विजय बामुगडे यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी सहाय्यक क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते सर, ताहेर आसी, डॉ. आफताब अन्वर शेख, संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच विद्याशिल्प पब्लिक स्कूलचे सीईओ कर्नल पी.डी. कुलकर्णी रिटायर्ड, मुख्याध्यापिका सहाना आरिफ आणि अश्विनी कुलकर्णी यांनीही विजय बामुगडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विजय बामुगडे गेल्या बारा वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून, या काळात त्यांनी अनेक खेळाडूंना घडवून राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून दिले आहे. क्रीडा संवर्धनासाठी आणि खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि केलेले कार्य याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.




Be First to Comment