


कंपनी मोठी होण्यासाठी कर्मचाऱ्यांचा विश्वास महत्वाचा – लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) कोणतीही कंपनी मोठी व्हायची असेल तर त्यासाठी कर्मचाऱ्यांचा विश्वास महत्वाचा असतो. टीआयपीएल कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तो विश्वास सिद्ध करून जीव तोडून काम करतात असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यावेळी काढले.
दानशूर व्यक्तीमत्व असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त विविधि उपक्रम राबवले जात आहेत. त्यापार्श्वभुमीवर ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमीटेड अर्थात टीआयपीएल कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या इयत्ता दहावी आणि बारावी परिक्षेमध्ये उज्वल यश संपादीत केल्या पाल्यांचा सत्कार सोहळा शनिवारी आयोजीत करण्यात आला होता. हा सन्मान सोहळा खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले कि, आत्ता पासून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल. टीआयपीएलमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी देखील कंपनी मदत करेल. तसेच टीआयपीएलच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयांमध्येही ५० टक्के फी माफी देण्याचे त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर आणि टीआयपीएलचे डायरेक्टर अमोघ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी टीआयपीएलचे डायरेक्टर सीएच भरणीकुमार, एम.पी.त्यागी, अरुण नाईक, जगदीश घरत, शशिकांत मुंबईकर, आनंद लाल, सतीश उगले, दीपक सिन्हा यांच्यासह टीआयपीएलचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आपण जो शब्द देतो तो पाळतो हा विश्वास कंपनीच्या अधिकारी आणि कार्मचाऱ्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केला. तर परेश ठाकूर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सध्याचे हे स्पर्धेचे युग आहे. जेवढे महत्व परिक्षांमध्ये गुणांना आहे तितकेच महत्वाचे व्यक्तिमत्व विकासही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कौशल्य गुणावर भर द्यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात दहावीच्या परिक्षेत कार्तिकी आर्गे, सानीका पाटील, स्वरा खेडकर, दुर्वा कडू, श्रेया घरत, पार्थ मोहिते, वैदेही म्हात्रे, अव्नी लाल, सेजल ठाकूर, युग मोकल, करुण्या गायकर, अनन्या चौहान तसेच बारावीच्या परिक्षेत श्रद्धा श्रीवास्तव, पार्थ सकपाल, गार्गी काले, जय तांडेल, शुभम कोळी, काजल कुमारी व इतर विद्यार्थ्यांचा घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.




Be First to Comment