
ठाकूर व कातकरी समाज एकवटला ; आ. प्रशांत ठाकूर, आ. विक्रांत पाटील यांची लाभली प्रमुख उपस्थिती
पनवेल/प्रतिनिधी :
संयुक्त राष्ट्र संघाने सन १९९४ रोजी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केले. त्या काळापासून जागतिक आदिवासी दिन जगात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. जसं जशी समाजात जनजागृती होत गेली तस तशी ९ ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सहाने साजरा होतांना दिसत आहे. भारत देशात, राज्यात, जिल्ह्यात आदिवासी दिन साजरा होत असतांना पनवेल तालुक्यात ठाकूर व कातकरी समाजाने जागतिक आदिवासी दिन उत्सव समितीच्या माध्यमातून मोठया संख्येने व उत्साहाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात यशस्वी झाले.
पनवेल तालुक्यातील विविध भागातून आलेल्या आदिवासी समाजातील रॅल्या या तालुक्यातील क्रीडा संकुलन या ठिकाणी पोहचल्या. हजारोंच्या संख्येने उपस्थिती असणारे आदिवासी बांधवाना पनवेलचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर आणि विधान परिषदचे आमदार श्री. विक्रांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. आ. प्रशांत ठाकूर यांनी योजनाची माहिती दिली तर आ. विक्रांत पाटील यांनी देशाच्या राष्ट्रपती पदावर असणाऱ्या आदिवासी महिला द्रौपदी मुर्मी यांच्या जीवनाचा इतिहास सांगत पनवेमध्ये आदिवासी बांधवाकारिता आदिवासी भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने उपस्थित असणाऱ्या ५ हजार आदिवासीकारिता नाश्ताची व्यवस्था आ. विक्रांत पाटील यांनी केल्याने आदिवासी दिन उत्सव समितीने आमदारांचे आभार मानले.

त्यानंतर सुयोग्य पद्धतीने आदिवासी बांधवानी रॅली काढत कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण केले. तसेच धरती आबा बिरसा मुंडा यांचे उभेहूब वेशभूषा करणारे धोदाणी गावातील आनंता सांबरी यांचे समाज बांधवांनी कौतुक केले.
यावेळी जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती पनवेलचे अध्यक्ष कृष्णा वाघमारे, उपाध्यक्ष गणपत वारगडा (पत्रकार) सचिव अनिल वाघमारे, एकनाथ वाघे गुरुजी, हिरामण नाईक, सी के वाक, धर्मा वाघ, अरुण कातकरी, मालडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी, कुंदा पवार, पांडुरंग पारधी, रामदास वाघमारे, आत्माराम भस्मा, रमेश वाघे, अशोक पवार, जना घुटे, रमेश भस्मा, चंद्रकांत संबरी, जनार्दन निरगुडा, पदमाकार चौधरी, सुनिल वारगडा, हिरामण पारधी, बाळू वाघे, राम नाईक, पांडुरंग भगत, मैद्या वाघ आदी. हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.





Be First to Comment