



ज्यांच्या आयुष्यात मांजर म्हणजे प्रेम, साथ, आणि आनंदाचं प्रतीक आहे, अशा मांजर प्रेमींसाठी आंतरराष्ट्रीय मांजर दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही, ८ ऑगस्ट – 2025 रोजी श्री कृपा एक्वेरियम व पेट केअर सेंटर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या आयोजनात शेकडो मांजर प्रेमींनी आपल्या लाडक्या मांजरांसह सहभाग घेतला. या निमित्ताने मांजरांसाठी विविध नामांकित कंपन्यांकडून मोफत फूड सॅम्पल्स, सप्लिमेंट्स आणि अन्य आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. मांजरांच्या आरोग्य, आहार आणि सुदृढतेसाठी पशुवैद्यकीय तज्ञांकडून मार्गदर्शन देखील करण्यात आले.
श्री कृपा एक्वेरियम व पेट केअर सेंटरच्या या आयोजनात हेल्प फाउंडेशनचे सदस्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. या अशा आयोजनात सहभागी झाल्याने मनाला समाधान लाभत असल्याचा मनोदय आणि याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात एखाद्या कॅट शोचे आयोजन करण्याचे आवाहन देखील मांजरप्रेमींनी केले.




Be First to Comment