Press "Enter" to skip to content

पेण मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

आदिवासी समाज भावनासाठी प्रयत्नशील – खासदार धैर्यशील पाटील

समाजासाठी भवन बांधा अन्यथा समाज आपल्याला मदत करणार नाही- कमलाकर काष्टे

पेण (वार्ताहर) : केंद्रासह राज्यातील सरकारच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी विविध योजना येत असताना त्या सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचणे तसेच आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या योजनांवर समाज्याच्या माध्यमातून ते पाहणे आपले कर्तव्य आहे तर येत्या काही दिवसांत एकत्र येत समाज भावनासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य खासदार धैर्यशील पाटील यांनी पेण येथे बोलून दाखवले.

पेण तालुका आदिवासी समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पेण शहरातून काढलेल्या रॅली नंतर गणपती वाडी येथील हॉटेल सौभाग्य ईन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर काष्टे, आदीम कातकरी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, विश्वास वाघ, आदिवासी ठाकूर समाज अध्यक्ष जोमा दरवडा, रायगड ठाकूर समाज अध्यक्ष हरेष वीर, आदिवासी समाज परिषद अध्यक्ष लक्ष्मण निगुडा, सचिव जनार्दन भस्मा, भाजपा जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी, दिनेश खैरे आदिंसह अनेक मान्यवर तसेच समाजातील हजारों बांधव भगिनी उपस्थित होते.

यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांनी सांगितले की पूर्वीच्या पेक्षा आता अमुलाग्रह बदल झाला असून आत्ताच्या घडीला शासनामार्फत समाजाला घरकुल, वीज, पाणी या सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत.आदिवासी समाजासाठी शासन असंख्य योजना राबविल्या जात आहेत.त्यामुळे समाजाने एकत्र येत एकसंघी राहिले पाहिजेत असे त्यांनी शेवटी सांगितले.यासह जोमा दरवडा यांनी प्रस्तावना केली असता सामाजाने दाखवलेली एकजूट आणि प्रामाणिकपणा हा उद्याचा पाया असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.तर समाजाला असणाऱ्या आरक्षणानुसार नोकर भरती होत नाही ती रखडलेली भरती तातडीने व्हावी म्हणजे येथील स्थानिक वंचित राहणार नाहीत.तर आमच्या समाजातील काही मंडळी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी शहरात भाजीपाला व्यवसाय करतात परंतु तेथील कर्मचारी त्यांना बसू देत नाहीत याकरिता त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी आमदार रवीशेठ पाटील यांच्याकडे केली.

तर अध्यक्षीय झालेल्या भाषणात कमलाकर काष्टे यांनी सांगितले की पेणच्या आदिवासी समाजाचा वापर फक्त निवडणूकी पुरता करू नका समाजाचा वैचारिक सामाजिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आम्हाला हक्काचे व्यासपीठ म्हणजेच समाजभवन एक वर्षात बांधून द्या असे त्यांनी खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रवीशेठ पाटील यांच्याकडे मागणी करत जो संसार आम्ही दरवर्षी हलवतो तो स्थिर राहील हीच एकमेव मागणी आमच्या समाजाची असून ती आपण पूर्ण करावी अन्यथा समाज आपल्याला यापुढे मदत करणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.यानंतर आदिवासी समाजाची परंपरा जपत मुला मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे पार पडले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.