
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी
नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद
काही महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राष्ट्रीय महामार्ग १७ क्रमांक या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याकरिता रायगड जिल्हा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पनवेल पळस्पा ते इंदापूर पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे पाहणी केली होती. त्यानंतर पुन्हा आज दिनांक ०७/०८/२०२५ रोजी सकाळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी पळस्पे कासू ते वडपाले महाड पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तसेच सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी केली आहे.
कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुखकर व्हावे म्हणून खड्डे मुक्त राष्ट्रीय महामार्ग रस्ता करण्याचे ठेकेदारांना आदेश देत संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त करून लवकरात लवकर सर्व काम या रस्त्याचे पूर्ण करण्याकरिता ठेकेदारांना सांगण्यात आले.
त्यावेळी आमदार रवींद्र पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा भोसले, पेण रोहा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी तसेच सर्व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे राष्ट्रीय महामार्गावर तमाम जनतेने फुलगुच्छ शाळा देऊन स्वागत केले तसेच जनतेचे अनेक प्रलंबित प्रश्नांचे निवेदन त्यांना देखील देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एका वर्षात शंभर टक्के काम पूर्ण होईल असे त्यावेळी सांगितले.





Be First to Comment