Press "Enter" to skip to content

शास्ती माफीच्या निर्णयासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांची भेट


पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः  दि.17 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री यांनी शास्ती माफीच्या निर्णय केल्यानंतर पनवेलकर नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खुप कौतुक केले परंतु 1 नोव्हेंबर 2022 पर्यंतचा मालमत्ता कर वसूल महानगरपालिका करत आहे या निर्णयामुळे अनेक रहिवाशांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. तरी या संदर्भात आज पनवेल नगरपालिकेच्या अधिकार्‍यांची शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेतली व त्यांच्या समोर काही मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.

यावेळी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, खांदा कॉलनी शिवसेना शहरप्रमुख शिवाजी थोरवे, नवीन पनवेल शहरप्रमुख अतुल मोकल, उपशहरप्रमुख मच्छिंद्र झगडे, शाखाप्रमुख हितेंद्र पेडामकर आदींनी संबंधित अधिकार्‍यांची भेट घेवून त्यांना 2016 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंतच्या न्यायविभाग व नगरविकास विभागाकडे प्रलंबित असून, अंतिम निर्णय होईपर्यंत मागील वर्षांचा कर भरण्याची सक्ती होऊ नये. तसेच आर्थिक वर्ष 2022-23, 2023-24, 2024-25 आणि 2025-26 या चार वर्षांचा मालमत्ता कर एकत्र मागे वसूल केला जात असून, त्यासाठी 90% सूट देण्यात आली आहे. मात्र, आर्थिक दृष्ट्या कमकुवत नागरिकांना ही एकरकमी रक्कम भरणे कठीण जात आहे.

त्यामुळे ही योजना फेर करून नागरीकांना टप्याटप्याने भरण्याची सवलत दयावी व 15 ऑक्टबर पर्यंत दिलेली मुदत पुढील 3 महिन्यापर्यंत वाढवुन दयावी व तसेच 31 जुलै पर्यंतची जी 5% सुट होती त्यामध्ये देखील 3 महिन्याची वाढ करण्यात यावी त्याचप्रमाणे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 129 (अ) नुसार 66 टक्के मालमत्ता कर सवलतीबाबत विचाराधीन आहे. आपण हा निर्णय तातडीने जाहीर करावा, अशी अपेक्षा आहे. व मालमत्ता धारकांनी मालमत्ता करासोबत शास्तीची रक्कम भरलेली आहे, त्यांना पुढील कर बिलामध्ये जी शास्ती रक्कम भरलेली आहे ती रक्कम नवीन येणा-या बिलामध्ये वजा करून मिळावी, अशी मागणी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.