
पेण, ता. 4 (प्रतिनिधी) : कोकणातील चिपळूण तालुक्याच्या दाळवटणे येथे शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते- दहिवली येथील कृषी पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी पांढऱ्या ऑइस्टर मशरूम पिशवी भरण्याचे प्रात्यक्षिक नुकतेच सादर केले आहे.
या प्रात्यक्षिकाचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मशरूम उत्पादन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती करून याच उद्देश ठेवण्यात आला असून यामध्ये विद्यार्थ्यांनी पेंढीची कापणी, स्वच्छता, फॉर्मालिन प्रक्रिया, वाळवणी, पिशव्यांमध्ये पेंढी व मशरूम बीजाचे (स्पॉन) थर लावणे, छिद्र करणे आणि पिशव्यांचे रचनेनंतरची काळजी या सर्व गोष्टी प्रात्यक्षिक मध्ये करून दाखविण्यात आले आहे.सदर प्रक्रियेद्वारे स्वच्छता, तापमान व आर्द्रतेचे व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण उत्पादन याचे महत्त्व समजून विद्यार्थ्यांना शिकता येत आहे.यावेळी प्राचार्य सुनीतकुमार पाटील, प्राध्यापक संग्राम ढेरे, साक्षी रेडीज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडून यात साईराज चव्हाण, मयूर रावते, प्रथम भरणकर,अरिहंत मगदुम, अश्विन विजयन, अमरनाथ एस.एल., महेश काळे, आर्य धुमाळ, यश निकम, प्रथमेश बर्गे, दास, आदित्य यासह आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.




Be First to Comment