Press "Enter" to skip to content

पनवेल बाजारपेठेतील राख्यांच्या रेशीमबंधनाला ज्वेलरीचा स्टायलिश लूक


पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : रक्षा बंधन जवळ आल्यामूळे आता प्रत्येक दुकानामध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. २५ रुपयांच्या साध्या राखीपासून ते २ हजार रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीचा पर्यायही खुला राखीसोबत मिठाई व इतर भेटवस्तूचे पैकेज खरेदीसही पसंती दिली जात आहे.
पनवेल परिसरातील बाजारपेठेमधील दुकाने राख्यांनी सजली आहेत. याशिवाय प्रत्येक विभागातील किराणा दुकानापासून ते विविध ठिकाणी राखी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

रक्षा बंधनसाठीची मागणी लक्षात घेऊन विविध प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलांना कार्टूनचे चित्र असलेल्या राख्यांसह ब्रेसलेट, पर्ल, चंदन, डिझायनर, जरदोसी, सीड्रोड, डायमंड, खुभराखी, रुद्राक्ष, चंदन व मौल्यवान खडे असलेल्या राख्यांचीही विक्री केली जात आहे. पूर्वी आकाराने मोठ्या राख्यांना ग्राहकांची पसंती मिळत होती. परंतु, आता आकाराने लहान व स्टायलिश राख्यांना पसंती मिळत आहे. सध्या राख्यांचा सरासरी भाव साधी राखी २५ ते १००, कुंदन वर्क ३० ते १६०,भोती राख्या २० ते ८०,कपल राखी ३० ते १२०,
सोने चांदी राखी ५०० ते २ हजार, लुबा राशी ५०० ते २०००, असे असून ऑनलाईन खरेदी मध्ये २५ रुपयांपासून ते १०० रुपयांपासून २ हजार व त्याहीपेक्षा जास्त किमतीच्या राख्या उपलब्ध होत आहेत. तसेच दूरच्या शहरात राहणाऱ्या भावासाठी कुरिअरने राखी पाठविणेही शक्य होत असून, बजेटप्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत. सध्या राख्या विक्रीच्या व्यवसायाने कोट्यवधीं रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.