

पेण , ता. 3 (वार्ताहर) : पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावात ग्रामस्थ व नवतरुण मित्र मंडळ यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.झाडे लावा झाडे जगवा या उद्देशाने आणि पर्यावरणासाठी झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वत्र वृक्षारोपण करण्यात येत आहे.सध्याच्या काळात झाडांची तोड मोठ्या प्रमाणात होत असून पर्यावरणाची फार मोठी हानी होत आहे.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जागोजागी झाडे लावणे अधिक महत्त्वाचे आहे.
तालुक्यातील अति दुर्गम भागात असणाऱ्या चांदेपट्टी गावातील असंख्य तरुण- तरुणी, ग्रामस्थ, महिलावर्गांनी आपल्या गावातील सभोवताली असणाऱ्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले आहे.यावेळी
मंडळाचे अध्यक्ष हिरामण जेधे, सचिव महेश भिकावले यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.





Be First to Comment