
खांब,दि.२(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील प्रा.शाळा पाले खु.येथे मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत राहून आपला सेवाकाळ अत्यंत प्रामाणिकपणे व सर्वांना सोबत घेऊन कार्य करणाऱ्या सुनीता जगन्नाथ मढवी आपल्या प्रदीर्घ ३९ वर्षांच्या सेवेतून सन्मानाने सेवानिवृत्त झाल्या आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने तसेच छत्रपती शिवरायांना अभिवादन करून करण्यात आले व सौ.खडाडे मॅडम व कापसे मॅडम यांनी उपस्थितीतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनीता जगन्नाथ मढवी यांनी माणगाव येथील अध्यापक विद्यालयात आपले शिक्षण पुर्ण करून पुढे त्यांनी लगेचच तानाजी मालुसरे उमरठ येथील दुर्गम भागात आपल्या शिक्षकी सेवेला प्रारंभ केला.
तदृनंतर रोहा तालुक्यातील चिल्हे,कुडली, वरसगाव,आंबेवाडी,कोलाड केंद्र शाळा व माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी केंद्र शाळा सेवा करून रोहा तालुक्यातील निवासस्थान असलेल्या संभे ग्रा.पं.हद्दीतील पाले खु.शाळेत मुख्याध्यापक पदावर सहा वर्षे सेवा करून सन्मानाने सेवानिवृत्त झाल्या आहेत.त्यांनी आपल्या सेवा काळात अतिशय उत्तमरीत्या व प्रामाणिकपणे केलेली सेवा व सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विविध संस्था व संघटना यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.तर त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर देखील कार्यरत आहेत.
त्यांचा परिवार हा सुसंस्कृत व उच्च शिक्षित असून त्यांचे पती हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहेत.तर मुलं देखील उच्च शिक्षित आहेत.तर त्यांच्या सेवानिवृत्तीच्या समयास केंद्र शाळा कोलाड व पाले खु.शाळा येथील शिक्षक वृंद व शिक्षणप्रेमी नागरिक यांनी एका आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ खांब जवळीळ नम्रता गार्डन पुगाव येथे त्यांच्या परिवाराचे वतीने एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर,प्रकाश थिटे,जगन्नाथ धनावडे,समीर महाबळे,हभप दहिंबेकर महाराज, महेश ठाकूर,मनोहर महाबळे,वाघिलकर(भाईंदर), सेवानिवृत्त वनाधिकारी धुमाळ,सुर्यकांत विरकर,प्रमोद विरकर, सुप्रिया क्षीरसागर,अमोल पाटील सांगली,छाया मोरे लातूर,साधना साखरकर,सौ.खराडे,विनोद ठाकूर, सरपंच जयराम मोरे, पुष्पा मोरे, अश्विनी खामकर,चेतन म्हात्रे, यशवंत मढवी, तुषार धुमाळ,राजू दिसले,आशिष पवार,मयूरी मढवी,श्यामल विरकर, ज्ञानेश्वर अहिरे आदी प्रमुख मान्यवरांसह त्यांचे आप्तस्वकीय व मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक तुषार धुमाळ व प्रतिक मढवी यांनी केले.तर स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची यशस्वीपणे सांगता करण्यात आली.




Be First to Comment