
पेण, दि. 3 (प्रतिनिधी) :-
महाराष्ट्र शासनाचा पोलीस सेवेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याने वडखळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाला आहे. टीबीएम स्पोर्ट्स कारावी कबड्डी संघातर्फे तर्फे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल कबड्डीच्या मैदानावर संघाचे आधारस्तंभ राकेश मोकल यांच्या हस्ते सत्कार करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यावेळी युवा नेते राकेश मोकल, नगरसेवक निवृत्ती पाटील, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, उद्योजक शैलेश पाटील, विनोद म्हात्रे, विवेक जोशी, कारावी गावचे पोलीस पाटील कल्पेश भोईर, टीबीएम संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश मोकल, शंकर म्हात्रे, कर्णधार सुशांत पाटील, संदेश पाटील, अभिषेक भोईर, पारस शिर्के, जितेश पाटील, करण पाटील, मंथन म्हात्रे, हितेश पाटील, प्रेषित बोरकर, राज पाटील, जय जुईकर, कौस्तुभ पाटील व वडखळ सागरी सुरक्षा रक्षक कबड्डी संघाचे पदाधिकारी, खेळाडू या सत्कार प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांचा भव्य दिव्य सत्कार करत टीबीएम स्पोर्ट्स कबड्डीच्या मैदानावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.




Be First to Comment