Press "Enter" to skip to content

विरेश कोठारी यांच्या सहयोगाने ई-एज्युकेशनबाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शन


खांब-रोहा,दि.३(नंदकुमार मरवडे)

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विरेश कोठारी यांच्या सहयोगाने ई -एज्युकेशनबाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शनपर कार्यक्रम रोहा तालुक्यातील श्रमिक विद्यालय चिल्हे येथे ता.१ रोजी संपन्न करण्यात आला.

साई फाऊण्डेशन चॅरिटेबल ट्रस्ट व नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहयोगाने व त्यांच्याच प्रयत्नांतून सर्वदूर संगणकीय शिक्षण व रायगड जिल्ह्याचा शैक्षणिक विकास या ध्येयातून कार्य करणाऱे सामाजिक कार्यकर्ते विरेश कोठारी व साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे चेअरमन डॉ.असिफ कासकर यांच्या साई फाऊण्डेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने सदरील ई-एज्युकेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे तथा मुख्य मार्गदर्शक संदेश गमरे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना सुयोग्य मार्गदर्शन करून ई-एज्युकेशनबाबतची माहिती दिली.यावेळी मुख्य मार्गदर्शक प्रथमेश शितकर,मुख्याध्यापक दिपक जगताप व विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य मार्गदर्शक संदेश गमरे यांनी ई-एज्युकेशनबाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करताना संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन संगणक साक्षर व्हावे.आमच्या वतीने सर्वातोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.