Press "Enter" to skip to content

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ.पनवेल तर्फे वृक्षारोपण सोहळा संपन्न

इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरात लावण्यात आली १०० झाडे ; आत्ता पर्यंत ६५० झाडें लावून त्यांचे संवर्धन

पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः  सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ,पनवेल तर्फ वृक्षारोपण सोहळा उत्सहात पार पडला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मंडळा तर्फे १०० वृक्ष पनवेल एस टी  स्टॅन्ड मागील इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरात लावण्यात आली.सदर प्रसंगी बहावा आणि कांचन ही देशी फुल झाडें लावण्यात आली.

आमदार प्रशांत ठाकूर तसेंच मा. विरोधी पक्ष नेते आणि जे एम म्हात्रे ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतमदादा म्हात्रे  यांनी या वृक्षारोपण सोहळ्याला उपस्थितीत राहून सिंधुदुर्ग मंडळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. आमदार प्रशांत ठाकूरनी सिंधुदुर्ग मंडळाचा दरवर्षी होणारा वृक्षारोपण सोहळ्याचे कौतुक करताना सांगितलं की सिंधुदुर्ग मंडळाचे कार्य फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधवांसाठी मर्यादित नसून इथल्या मातीशी एकरूप होऊन इथल्या सामाजिक कार्यात देखील आपला मौलिक वाटा उचलून समाजसेवा करत असतात अशी प्रशंसा करून आपण देखील मंडळाच्या सेवा कार्यात लागेल ते सहकार्य करू अस आश्वासित केलं.आमदार प्रशांत  आणि प्रीतम  यांनी मैत्रीदीना शुभेच्छा दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाने आत्ता पर्यंत ६५० झाडें लावून त्यांचे संवर्धन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष  केशव राणे यांनी पनवेल परिसरात अश्या प्रकारचे उपक्रम राबवून हे सेवा कार्य करत राहू असं सांगून ह्या वृक्षारोपण कार्यक्रमांची सांगता केली ह्या प्रसंगी संघ सल्लगार मंगेश अपराज,उपाध्यक्ष संतोष चव्हाण,प्रिया खोबरेकर यांनी उपस्थिती राहून मार्गदर्शन केले.

सहखजिनदार  बाबाजी नेरुरकर,प्रदीप रावले यांचे सहकार्य लाभले.मंडळाचे  सचिव रामचंद्र मोचेमाडकर यांनी सर्वांचे आभार मानले.महिला सदस्य स्मिता चव्हाण,अर्चना तावडे,पूजा जाधव,कल्पना राणे, आरती सावंत,जेष्ठ मनोहर मराळ,वासुदेव सावंत,मंगेश सावंत,प्रशांत खोबरेकर,प्रसन्नकुमार घागरे,प्रमोद सावंत,उमेश सामंत,प्रमोद मिस्त्री,बाळाजी रावराणे,प्रभाकर येरम,विनोद परब,जगदीश जाधव, मंगेश माधव, सुरेश पवार,दशरथ सावंत यांनी उपस्थित राहून सदर वृक्षारोपण पार पडले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.